महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय लोक अदालत कार्यक्रमात बदल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार नागपूर जिल्हा न्यायालय, नागपूर जिल्हयातील कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, ग्राहक तकार निवारण आयोग तसेच जिल्हयातील सर्व तालुक्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालयांमध्ये २०२४ मधील २ रे राष्ट्रीय लोक अदालत ५ मे २०२४ व ३ रे राष्ट्रीय लोक अदालत १४ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजन करण्यात आले होते.

परंतु महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार राष्ट्रीय लोक अदालत पुढे ढकलण्यात आली असून २ रे राष्ट्रीय लोक अदालत २७ जुलै २०२४ रोजी व ३ रे राष्ट्रीय लोक अदालत २८ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजीत करण्यात येणार आहे याची नागपूर जिल्हयातील सर्व संबंधित शासकीय कार्यालये, शासकीय व अशासकीय वित्तीय संस्था, विमा कंपनी, पक्षकार, वकील व ईतर संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे नागपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव सचिन पाटील यांनी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकातून कळविले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos