महत्वाच्या बातम्या

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य निघालेल्या रॅलीचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्य शहरातुन निघालेल्या रॅलीचे गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी रॅलीत सहभागी भिमसैनिकांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शीतपेयाची व पिण्याच्या व्यवस्था करण्यात आली होती.

या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या बहुजन विभाग महिला शहर प्रमुख विमल कातकर, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, सविता दंडारे, सायली येरणे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, आदिवासी विभागाचे युथ शहर अध्यक्ष जितेश कुळमेथे, युवा नेते अमोल शेंडे, रासेद हुसेन, नकुल वासमवार, दुर्गा वैरागडे, आशा देशमुख, निलिमा वनकर, माधूरी निवलकर, सरोज चांदेकर, कविता निखारे, नितेश गवळी, अनिता झाडे, कार्तिक बुरेवार आदींची उपस्थिती होती.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्य संध्याकाळी शहरातील विविध भागातुन रॅल्या काढण्यात आल्यात. या रॅलींचे स्वागत करण्यासाठी गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत मंच उभारण्यात आले होते. 

सदर रॅली स्वागत मंच जवळ पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने रॅलीचे स्वागत करण्यात आले. यावेळी रॅलीत सहभागी भिमसैनिकांसाठी शितपेयाची व पिण्याच्या व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos