महत्वाच्या बातम्या

 मतदान अधिकाऱ्यांची तीसरी सरमिसळ प्रक्रिया पूर्ण 


- मतदान केंद्रनिहाय अधिकारी निश्चित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : लोकसभा निवडणुकीकरिता मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तीसरी व अंतिम सरमिसळीकरणाची (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली. यानुसार आता जिल्ह्यातील कोणत्या मतदान केंद्रावर कोणते अधिकारी राहतील याची निश्चिती करण्यात आली. निवडणूक निरीक्षक राहुल कुमार, जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, नोडल अधिकारी प्रशांत शिर्के, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी एस.आर.टेंभूर्णे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, प्रा. रुपेशकुमार गौर, प्रा.ए.झेङ हकीम यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात संगणक प्रणालीद्वारे ही प्रक्रीया पूर्ण करण्यात आली.

सरमिसळ प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली व अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघाकरिता मतदान केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी म्हणून ४ हजार २०१ पुरूष व ६१ महिला मतदान अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यातील १० टक्के मतदान अधिकारी राखीव राहतील. आरमोरी विधासभा मतदार संघात १३३९ पुरूष व १९ महिला, गडचिरोली क्षेत्राकरिता १ हजार ५७२ पुरूष व २२ महिला तर अहेरी विधानसभा क्षेत्राकरिता १२९० पुरूष व २० महिला मतदान अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos