महत्वाच्या बातम्या

 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली टपाली मतदान प्रक्रियेची पाहणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघात ८५ वर्षावरील व दिव्यांग मतदारांना टपाली मतदानाची प्रक्रिया १२ एप्रिल २०२४ पासून सुरू झाली आहे. वर्धा विधानसभा मतदार संघातील सिंदी मेघे येथील ८५ वर्षावरील महिला मतदार नलीनी बाबाराव साळवे यांची प्रत्यक्ष गृहभेट घेवून टपाली मतदान प्रक्रियेची निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पाहणी केली.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच नमुना १२ डी भरुन दिलेल्या ८५ वर्षावरील व दिव्यांग मतदारांना गृहभेटी द्वारे टपाली मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे.

४७ -वर्धा विधानसभा मतदार संघात ८५ वर्षावरील २६१ मतदार व ३४ दिव्यांग मतदार असे एकूण २९५ मतदार गृहभेटीव्दारे मतदानास पात्र ठरले असून १२ एप्रिल २०२४ रोजी ८५ वर्षावरील ५९ आणि ९ दिव्यांग मतदार असे एकूण 68 मतदारांनी टपाली मतदान केले.





  Print






News - Wardha




Related Photos