महत्वाच्या बातम्या

 भाजपचे नेते तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा एटापल्ली तालुक्यात प्रचाराचा झंजावात


- अतिदुर्गम बुर्गी, जिवनगट्टा येथे प्रचार सभा संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : भाजपा व महायुतीचे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ एटापल्ली तालुक्यातील बुर्गी व जिवनगट्टा येथे प्रचार सभा संपन्न झाली.

गेल्या १० वर्षांमध्ये मोदीच्या नेतृत्वात सरकारने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात भरघोस विकास निधी देऊन गावागावांना विकासाच्या प्रवाहात सामील करण्याचे काम केले आहे. विकासाची ही प्रक्रिया निरंतर सुरु ठेवण्यासाठी पुन्हा एकदा मोदीजींच्या सरकारला मतरुपी आशीर्वाद द्या असे आवाहन भाजपचे नेते तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले. राजेंचा गावात आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात भव्य असा जंगी स्वागत केले.
याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos