महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर येथील देवी महाकालीच्या यात्रेस येणा-या भाविकांना आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील देवी महाकालीचा चैत्र नवरात्र उत्सव सोहळा १४ एप्रिल २०२४ पासुन साजरा करण्यांत येत आहे. या उत्सवाच्या दरम्यान महाकालीच्या दर्शनास स्थानिक भाविकांसोबतच मराठवाडयातील भाविक मोठ्या संख्येने चंद्रपूर येथे येऊन देवी महाकालीचे दर्शन घेतात. हा उत्सव सुमारे एक महिना सुरू असतो व त्यामुळे या कालावधीत मोठ्या प्रमाणावर भाविकांची ये-जा प्रवासी वाहनातुन होत असते.

चंद्रपूर पोलीस प्रशासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, मोठ्‌या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था तसेच रहदारीस कुठलाही त्रास अथवा अडथळा होवु नये याकरीता १४ एप्रिल २०२४ पासुन ते २३ एप्रिल २०२४ पर्यंत वाहतुक व्यवस्थेत बदल करून सदर कालावधीत अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्ग सायकल खेरीज सर्व वाहनांकरीता बंद राहील. तसेच अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्ग नो पार्कंग झोन घोषीत करण्यात येत आहे. बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड या यात्रा परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी मोटार सायकल व ऑटोनी शहरात जाण्यासाठी व परत येण्यासाठी भिवापूर-हनुमान खिडकी-दादमहल वार्ड या मार्गचा वापर करावा. तसेच चारचाकी वाहनांने शहरात किंवा बाहेर जायचे असल्यास कामगार चौक मार्गे बायपास रोड किंवा लालपेठ महाकालीच्या दर्शनासाठी येणारे महाराष्ट्रातील जिल्हयातील तसेच इतर राज्याबाहेरून भाविक हे बहुतांशी वेगवेगळ्या प्रवासी वाहनातुन प्रवास करून येत असतात. प्रवासी वाहनाच्या व्यतिरिक्त माल वाहतुक करणाऱ्या वाहनामधुन देखील मोठ्या प्रमाणावर भाविक प्रवास करून येत असतात. देवी महाकालीच्या दर्शनासाठी येतांना बहुतेक भाविक वाहन प्रवासी आसन क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवासी बसवुन धोकादायक परिस्थितीत प्रवास करतात. अशावेळी एखादा दुर्देवी अपघात झाल्यास मोठया प्रमाणावर जिवीत हानी होण्याची शक्यता असते.

देवी महाकालीचे दर्शनास बाहेरून येणाऱ्या सर्व भाविकांची यात्रा सुखरूप व सुरक्षीत पार पाडावी या दृष्टीने चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाचे वतीने सर्व भाविकांना विनम्र आवाहन करण्यात येते की, त्यांनी चंद्रपूर पर्यंतचा प्रवास अधिकृत प्रवासी वाहनातून करावा. मालवाहतुक करणाऱ्या वाहनातुन प्रवास करण्याचे पुर्णतः टाळावे व वाहनांच्या प्रवासी आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवुन प्रवास करू नये. चंद्रपूरला येणारे सर्व भाविक या सुचनांचे पालन करून चंद्रपूर पोलीस प्रशासनास सहकार्य करतील अशी विनंती आहे. या सुचनांचे उल्लघंन झाल्यास भाविक / वाहनचालक/वाहनमालक कायदेशिर कार्यवाहीस पात्र राहतील यांची सर्वानी नोंद घ्यावी.





  Print






News - Chandrapur




Related Photos