जिद्दीला सलाम : दोन्ही पायांनी दिव्यांग मतदाराने नाल्यातून पोहत येवून कोठी येथे केले मतदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मनिष येमुलवार / भामरागड :
तालुक्यातील अनेक गावांना नदी - नाल्यांनी वेढले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून नदी - नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आहे. मात्र अशाही परिस्थितीत आज पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीच्या मदतानात काही जिद्दी मतदार  सहभागी झाले आहेत. अशाच एका जिद्दी मतदाराला सलामच ठोकावा लागेल.
दोन्ही पायांनी दिव्यांग असताना चक्क नाला पोहत पार करून मतदान केंद्र गाठले व मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याने शहरी आणि सुदृढ परंतु मतदानाच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी न होणाऱ्या नागरीकांना चांगलीच चपराक लावली आहे.
भामरागड तालुक्यातील तुमरकोठी येथील प्राजुन लिंगुु गावडे असे या दिव्यांग मतदाराचे नाव आहे. प्रांजुन यांचे वय ४३ वर्ष आहे. तरीही त्यांनी पाण्यातून पोहत येवून मदानाचा हक्क बजावला आहे. महसूल प्रशासनाने त्यांना नाला पार करून देण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांनी कोणतीही मदत न घेता स्वतः नाला पार करून मतदानासाठी येणार असल्याचे ठामपणे सांगितले.
महसूल विभागाने तालुक्यातील मरकनार, तुमरकोटी, मुरूमभुशी, कोरपर्शी, फुलनार, पोयरकोटी येथील मतदारांना डोंग्याच्या सहाय्याने तसेच हातात हात पकडून नाला पार करून मतदान केंद्रावर आणले. 

सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदारांची दुचाकीने मतदान केंद्रांना भेट

भामरागडचे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी कैलास अंडील यांनी निवडणूकीच्या कामासाठी बरीच मेहनत घेतली आहे. अंडील यांनी आज दुचाकीच्या सहाय्याने तालुक्यातील संपूर्ण मतदान केंद्रांना भेटी देवून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. तालुक्यातील २८ मतदान केंद्रांना भेटी देवून मतदानाची स्थिती जाणून घेतली. विशेष म्हणजे दुचाकीने मतदान केंद्रांना भेटी देणारे आतापर्यंतचे ते पहिले सहाय्यक निवडणूक अधिकारी ठरले आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-21


Related Photos