महत्वाच्या बातम्या

 मतदार जनजागृतीसाठी हिंगणघाट येथील आगरकर विद्याभवनद्वारे गोलमेज परिषदेचे आयोजन


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व मतदान जनजागृती करण्यासाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत एका नाविन्यपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांशी साधक बाधक चर्चा व्हावी व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नांची उकल होऊन त्यांच्याद्वारे मतदान जनजागृती करता यावी, या उद्देशाने हिंगणघाट येथील आगरकर विद्याभवनद्वारे गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या गोलमेज परिषदेमध्ये हिंगणघाट पंचायत समितीच्या विषय साधन व्यक्ती संगीता पेठे, जी.बी.एम.एम. हायस्कूलचे पर्यवेक्षक डी.जी. पवार, बी.एल.ओ. मिलिंद सावरकर, भारत रूपारेल, शाळेचे मुख्याध्यापक अशोक जोशी यांनी विद्यार्थ्यांद्वारे विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देत मतदान जनजागृतीच्या अनुषंगाने चर्चा घडवून आणली.

विद्यार्थ्यांनी देखील अतिशय उत्तमरित्या प्रतिसाद नोंदवून मतदार नोंदणी आणि मतदान प्रक्रियेबाबत आपल्या शंका निरसन करून घेऊन गोलमेज परिषदेचा आनंद घेतला. या उपक्रमाला स्वीपचे नोडल अधिकारी अशोक कोडापे व गटशिक्षणाधिकारी अलका सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. पूनम जोशी, गोपाल जोशी व आगरकर विद्याभवनचे शिक्षक यांनी उत्तम सहकार्य केले.

०४६- हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाकरीता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार सतीश मासाळ, नायब तहसीलदार सागर कांबळे यांच्या मार्गदर्शनामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.





  Print






News - Wardha




Related Photos