महत्वाच्या बातम्या

 संयुक्त धान्य व्यापारी संघटनेची बैठक खा.नेते व वि.प.माजी आमदार रामदास आंबटकर यांच्या नेतृत्वात संपन्न


- धान्य व्यापारी संयुक्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक भगवती राईस मिल मुरखळा येथे संपन्न 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : १० एप्रिल रोज बुधवारी महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ संयुक्त धान्य व्यापारी संघटनेची सहविचार बैठक भगवती राईस मिल येथे खा.नेते व वि.प. माजी आमदार रामदास आंबटकर यांच्या नेतृत्व मार्गदर्शनात बैठक सभा पार पडली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षाच्या कार्यकाळात अनेक योजना व ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभुमीवर पुन्हा मोदींच्या नेतृत्वातील सरकारला मतदारांचा कौल मिळेल आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार विराजमान होईल, असा विश्वास व्यक्त करत याकरिता पुन्हा एकदा नरेंद्र मोदीना पंतप्रधान बनवायचे आहे. यासाठी अब की बार चारसौ पार करत फिर एक बार मोदी सरकार, येत्या १९ तारखेला ला कमळावर मतदान करुन प्रचंड बहुमताने विजयी असे प्रतिपादन खा. नेते यांनी या व्यापारी बैठकीला संबोधीत केले.

यावेळी महायुतीचे उमेदवार तथा खा. अशोक नेते, वि.प.माजी आमदार रामदास आंबटकर, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार, की.आ.प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, उद्योग आघाडी चे जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल, सामाजिक नेते नंदु काबरा, कृ.उ.बा.स. संचालक तथा उद्योजक नंदकिशोर सारडा, उद्योजक रमेश सारडा, कृ.उ.बा.स.संचालक दिलिप बुरले, प्रकाश निकुरे, तसेच मोठ्या संख्येने धान्य व्यापारी उपस्थितीत होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos