महत्वाच्या बातम्या

 दुसऱ्या दिवशी ५११ मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : ११ भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात गृह मतदान म्हणजे होम वोटिंग प्रक्रिया मतदारसंघात सुरू झाली आहे. काल आठ एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यातून ३३४ (८५ वर्षावरील व दिव्यांग मतदारांनी) गृह मतदान सुविधेचा लाभ घेत मतदानाचा हक्क बजावला. तर गोंदियात १७७ मतदारांनी गृहमतदान केले.

सात एप्रिल, २०२४पासून लोकसभा मतदारसंघात गृह मतदान सुरू झाले आहे. त्यानुसार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या  टीम करून त्याद्वारे गृह मतदान प्रक्रिया आयोगाच्या निर्देशानुसार सुरळीतपणे पार पाडली आहे. सात एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यात ५३६ मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला होता.





  Print






News - Bhandara




Related Photos