महत्वाच्या बातम्या

 रेल्वेच्या धडकेत अज्ञात इसमाचा मृत्यू 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : काल रात्री ८ एप्रिल रोजी अज्ञात इसम रेल्वे गाडी खाली येऊन कटून मृत्यू झाला. 

८ एप्रिल रोजी रात्री अंदाजे १० वाजताच्या सुमारास एक अज्ञात इसम रेल्वे रुळावर ब्लँकेट ओढून बसला होता. त्याचवेळी त्या रुळावर गाडी आली असता त्यात तो चिरळल्या गेला. 

सदर इसम पुरुष जातीचा असून अंदाजे वय (२५-३०) गहु वर्णीय मध्यम बांध्याचा, उंची अंदाजे ५ फुट ६ इंच , अंगात सिमेंट रंग व पांढ-या रंगाचे आडव्या लाईनींग ची टि शर्ट व काळ्या रगांचा फुल पॅंट अश्या वर्णनाचा इसम रेल्वेने कटून मरण पावला आहे. त्याचे शव उपजिल्हा रुग्णालय बल्लारपूर येथे ठेवण्यात आले आहे.

सदर मयत इसमाची अद्याप पावेतो ओळख पटली नसल्याने सदर अनोळखी इसमाबाबत माहिती असल्यास त्यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण तळी करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos