महत्वाच्या बातम्या

 धान खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदनी करावी : पणन विभागाचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : आधारभूत किंमत धान खरेदी योजना रब्बी पणन हंगाम २०२३-२४ करिता भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, पणन महासंघाच्या अ वर्ग सभासद असलेल्या संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी रब्बी पणन हंगाम २०२३-२४ मध्ये धान विक्री करण्याकरिता आपल्या नावाची नोंदणी करावी व त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे जसे की जमिनीचा ऑनलाईन सातबारा उतारा, नमुना ८, बँकेचे पासबुक अथवा रद्द केलेला धनादेश, अद्यावत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे खरेदी केंद्रावर नेऊन तिथे आपली नावे नोंदवावी. जेणेकरून रब्बी पणन हंगाम २०२३-२४ मध्ये धान खरेदी करता येईल. तरी ३० एप्रिल २०२४ पर्यंत शेतकरी बाधवांनी उन्हाळी धान खरेदीसाठी पुर्वतयारी म्हणुन खालील नमुद संस्था कागदपत्र सादर करुन धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीचा लाभ घेण्यात यावा असे जिल्हा पणन अधिकारी यांच्याकडुन आव्हान करण्यात येत आहे. 

तालुका- संस्थेचे नाव- केंद्राचे नाव-

१. भंडारा- भंडारा सहकारी धान्य गिरणी लि. कारधा- कारधा
२. भंडारा- भंडारा जिल्हा कृषी औद्योगिक संघ लि.भंडारा- धारगाव
३. भंडारा- दि लक्ष्मी सहकारी धान गिरणी मर्या.वाकेश्वर- वाकेश्वर
४. मोहाडी- मोहाडी सहकारी शेतकी खरेदी विक्री संघ लि.मोहाडी- मोहाडी
५. मोहाडी- मोहाडी सहकारी शेतकी खरेदी विक्री संघ लि.मोहाडी- मोहगावदेवी
६. तुमसर- तुमसर सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती लि.तुमसर- हरदोली सिहोरा
७. तुमसर- दि सिहोरा को.ऑप.राईस मिल,सिहोरा- सिहोरा
८. लाखनी- साकोली तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती लि.लाखनी- सालेभाटा
९. लाखनी- साकोली तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती लि.लाखनी- जेवनाळा
१०. लाखनी- दि पिंपळगाव सहकारी राईस मिल लि.पिंपळगाव- पिंपळगाव
११. लाखनी- दि जवाहर सहकारी भात गिरणी मर्या.लाखोरी- लाखोरी
१२. लाखनी- दि भगिरथ सहकारी भात गिरणी लि.मुरमाडी (तुप)- मुरमाडी (तुप)
१३. साकोली- आदर्श सहकारी राईस मिल लि.सानगडी- सानगडी
१४. साकोली- श्रीराम सहकारी भात गिरणी लि.साकोली- साकोली
१५. साकोली- श्रीराम सहकारी भात गिरणी लि.साकोली- विर्शी
१६. लाखांदुर- विजयलक्ष्मी सहकारी राईस मिल सोसा.लि.लाखांदुर- लाखांदुर
१७. लाखांदुर- दि पंचशिल सहकारी धन गिरणी मर्या.मासळ- मासळ
१८. पवनी- पवनी सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती लि.पवनी- वाही
१९. पवनी- पवनी सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती लि.पवनी- कोदुर्ली
२०. पवनी- दि किसान सहकारी तांदुळ गिरणी मर्या.चिचाळ- चिचाळ





  Print






News - Bhandara




Related Photos