महत्वाच्या बातम्या

 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपुरातून २६ तर रामटेकमधून २८ उमेदवार


- रामटेकमधून सात उमेदवारांचे अर्ज मागे

- नागपुरातून एकही अर्ज मागे नाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी अर्ज मागे घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी रामटेक लोकसभा मतदारसंघातून सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही.

नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची संख्या एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्यामुळे २६ अशी कायम आहे. तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही संख्या ३५ वरून २८ अशी झाली आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघातून गौरव गायगवळी, दर्शनी धवड, नरेश बर्वे, प्रकाश कटारे, डॉ. विनोद रंगारी, सुरेश साखरे आणि संदीप गायकवाड यांनी अर्ज मागे घेतले आहेत. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos