महत्वाच्या बातम्या

 खर्च निरीक्षक के.जी. अरुणराज यांनी घेतला देवळी विधानसभा मतदार संघाचा आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : भारत निवडणूक आयोगाव्दारे ०८ - वर्धा लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या वर्धा, देवळी व हिंगणघाट या विधानसभा मतदार संघासाठी खर्च निरीक्षक म्हणून के. जी. अरुणराज यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने देवळी विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयी भेट देऊन निवडणूक खर्चाच्या संबंधित सर्व अधिकारी तसेच विविध पथकांचा आढावा घेतला.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भुसंपादन (सामान्य) प्रियांका पवार, पुलगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर चव्हाण, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी सुरज बारापत्रे, तहसिलदार दत्तात्रय जाधव, आचार संहिता नोडल अधिकारी तथा गट विकास अधिकारी प्रफुल्ल लोखंडे यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

४५ -देवळी विधानसभा मतदार संघामध्ये आचार संहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ४ भरारी पथक, ५ एसएसटी पथके, ६ व्हीएसटी पथके याप्रमाणे विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीनंतर खर्च निरीक्षक अरुणराज यांनी देवळी तालुक्यातील शिरपुर (होरे) येथील चेकनाक्याच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली तसेच चेकनाक्यावरील नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना वाहन तपासणी बाबत सूचना दिल्या.





  Print






News - Wardha




Related Photos