महत्वाच्या बातम्या

 २९ ते ३१ मार्च पर्यंत शासकीय सुट्टीच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय राहणार सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / वर्धा : सन २०२३-२४ हे वित्तीय वर्ष ३१ मार्च रोजी संपणार असून महसुली उद्दीष्ट साध्य करण्यासाठी तसेच मार्च अखेर असल्यामुळे नवीन वाहन नोंदणी, कर वसुली करुन शासकीय महसूल जमा होण्यासाठी २९ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत या शासकीय सुट्टीच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहणार आहे.

शासकीय सुट्टीच्या तीन दिवसीय कालवधीत नवीन वाहन नोंदणी व त्याअनुषांगिक कर वसुलीचे कामकाज तसेच थकीत कर वसुली खटला विभाग (महसुल जमा होणारे कामकाज) सुरू ठेवण्यात येणार आहे. नवीन वाहन खरेदीदारांनी या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वाहन नोंदणी करुन घ्यावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मो. समीर मो. याकुब यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos