महत्वाच्या बातम्या

 भंडारा- गोंदिया  लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : भारत निवडणूक आयोगाने   भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची (General Election Observer) नियुक्ती केलेली आहे. विनय सिंग हे लोकसभा मतदारसंघाचे  निवडणूक निरीक्षक असतील.
विनय सिंग यांचा संपर्क क्रमांक 8010487939 व 07184 -299203 असा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी प्रफुल केळकर हे आहेत. शासकीय विश्रामगृह भंडारा येथे नागरिकांना प्रत्यक्ष भेटीसाठी उपलब्ध राहतील.
भारतीय महसूल सेवेतील हर्ष वर्धन हे भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी खर्च निरीक्षक म्हणून काम करणार आहेत .त्यांचे निवासस्थान शासकीय विश्रामगृह येथे असून 7620396795 या नंबरवर त्यांच्याशी संपर्क करता येईल. राजेश ढुमणे हे त्यांचे संपर्क अधिकारी आहेत.

 राजपाल सिंग संधू हे भंडारा -गोंदिया तसेच गडचिरोली या लोकसभा मतदारसंघासाठी कायदा व सुव्यवस्था निरीक्षक म्हणून नियुक्त आहेत. सध्या  चैतन्य विश्रामगृह, पोलीस मुख्यालय, भंडारा येथे त्यांचे वास्तव्य आहे . त्यांचा संपर्क क्रमांक 9552096663 असा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भूषण कोळी आहेत.

कोणत्याही राजकीय पक्षांची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास उक्त क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत पिसाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos