नि:शुल्क मोबाईल सेवेच्या माध्यमातून शेतीतून घेतले दुप्पट उत्पन्न


- गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा 
 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : 
 रिलायंस फाउंडेशनच्या नि:शुल्क मोबाईल सेवेच्या माध्यमातून माहिती सेवांचा लाभ घेउन   गोंदिया जिल्ह्यातील पांजरा या दुर्गम गावातील शेतकऱ्याने  शेतीतून दुप्पट उत्पन्न घेतले असून इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. 
जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील पांजरा या दुर्गम गावातील   टलुरामजी बळीराम पटले हे ५६ वर्षे वयाचे शेतकरी मागील ३५ वर्षापासून पारंपारिक पद्धतीने शेती करतात. त्यांचेकड़े स्वताची २२ एकर आणि ठेक्याने घेतलेली ५ एकर अशी एकून २७ एकर शेती आहे . त्यापैकी आठ एकर शेती रब्बी हंगामासाठी ओलीताखाली होती. खरीप हंगामात संपूर्ण २७ एकरामध्ये ते पारंपारिक धानाचे पीक घेतात. रब्बी हंगामात गहू , हरभरा लाखोरी आणि चारा पिके घेतात. पारंपारिक पद्धतीने शेती करताना येणाऱ्या अडचनींना तोंड देत टलुरामजी शेती करायचे. शेती तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती नसल्यामुळे त्यांचेकड़े भरपूर शेती आणि ओलिताची सोय असुनही त्यांना मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाण कमीच असायचे. 
  सन २०१६ मध्ये त्यांचा रिलायंस फाउंडेशन माहिती सेवेच्या चमुशी संपर्क आल्यानंतर टलुरामजीचे जीवनच बदलून गेले. सन २०१६ पासून रिलायंस फाउंडेशन माहिती सेवेच्या मोबाईल फोनवरून निशुल्क मिळणाऱ्या ध्वनि संदेश आणि हेल्पलाइन या सेवांचा लाभ घेत ते तंत्रज्ञानावर आधारीत शेती करू लागले. या सेवा सहज हव्या त्या वेळी आणि हव्या त्या ठिकाणी मोफत मिळू लागल्यामुळे त्यांचा उत्साह वाढत गेला. पीक पद्धतित बदल , किड आणि रोगांची समस्या , बियाने आणि  खते तसेच ओलीत व्यवस्थापन या बाबतच्या तंत्राची अचूक माहिती त्यांना मोबाईल फोन द्वारे तज्ञाकडून मिळू लागली. नांगरणी , वखरणी , पेरणी आणि आंतरमशागतीच्याकामावर येणाऱ्या खर्चात त्यांना २०% बचत करता आली. खते , बियाने आणि कीटकनाशकांसारख्या निविष्ठांवरील खर्च २७% ने कमी झाला . एकून खर्चात त्यांची २२ टक्के ने बचत झाली . आधी सुमारे रु.३.०० लाखापर्यंत येणारा खर्च आता रु. २.३४ लाखांवर आणता आला. 
 दुसरीकडे त्यांच्या पीक उत्पादनात देखिल लक्षणीय वाढ झाली. या सेवांचा लाभ घेण्यापूर्वी पारंपरिक पद्धतिंचा अवलंब करीत त्यांनी एका वर्षात तांदुळ , गहू , हरभरा आणि लाखोरी या पिकांपासुन सुमारे रु.७.०० लाख किमतीचा शेतमाल उत्पादित केला. त्यासाठी त्यांनी रु.३.०० लाख खर्च करून  रु. ४.०० लाख निव्वळ उत्पन्न मिळविले होते. रिलायंस फाउंडेशनच्या माहिती सेवांचा लाभ घेउन तज्ञाच्या सल्ल्यानुसार शेती केल्यामुळे नंतर त्यांना २०१७ -१८ मध्ये रु.१०.७८ लाख किमतीचा शेतमाल झाला. त्यातून रु.२.३४ लाख खर्च वजा जाता रु.८.४४ लाख एवढे वार्षिक उत्पन्न मिळविता आले. अर्थात, त्यांचे हे उत्पन्न आधीच्या रु. ४.०० लाखांवरुन रु.८.४४ वर म्हणजेच दुपट्टीपेक्षा अधिक झाले.
या व्यतिरिक्त त्यांनी एक एकरपेक्षाही कमी क्षेत्रामधून तज्ञानी सुचवील्यानुसार तीळाचे उन्हाळी पीक घेउन त्याचे २.०० क्विंटल यशस्वी उत्पादन घेतले.
 शेतिसोबतच टलुरामजी चांगले पशुपालक देखिल आहेत. त्यांचेकड़े गाई, म्हशी , वासरे , बैल मिळून ५० जनावरे आहेत.पशुपालनाविषयी, त्यांच्या आजराविषयी सुद्धा ते रिलायंस फाउंडेशनचेच मार्गदर्शन घेत असतात. मागील वर्षी मृत्युच्या स्थितीत असलेल्या त्यांच्या एका म्हैशीला रिलायंस फाउंडेशनच्या हेल्पलाइनच्या माध्यमातून पशुवैद्यकीय तज्ञाच्या मदतीने जीवनदान मिळाले व नंतर ती म्हैस रु.४५ हजाराला विकली.
   अशा प्रकारे रिलायंस फाउंडेशनच्या संपर्कात येवून शेतीतंत्राचा योग्य आणि नियोजनपूर्वक वापर करून दोन वर्षाच्या काळात दुपट्टउत्पन्न झाल्यामुळे टलुरामजींचे जीवनमान पूर्णपणे बदलून गेले आहे.
      मागील वर्षी त्यांनी शेतामध्ये नविन कुपनलीका खोदून शाशनाची कोणतीही मदत न घेता ओलिताचे क्षेत्र आठ एकरवरून १३ एकरपर्यंत वाढविले आहे. त्यांचेवर असलेले कर्ज फेडून ते आता कर्जमुक्त झाले आहेत. एवढेच नव्हे तर स्वमेहनतीने आणि दूरदृष्टिने त्यांनी दोन नविन ट्रक्टर्स विकत घेतले आहेत. आपल्या मुलांना व नातवांना ते चांगले शिक्षण देऊ शकत आहेत. पशुपालनामध्ये देखिल त्यांचा नाव लौकिक असून त्यांचे घर म्हणजे जाहिरात न करता उत्तम प्रतीचे दूध विक्री केंद्र बनले आहे. पीक उत्पादन तथा गाई म्हाशिंचे आरोग्य आणि दूध उत्पादन यामध्ये रिलायंस फाउंडेशन माहिती सेवांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांचे मत आहे. या सेवांमुळे त्यांना शेती आणि पशुपालनाविषयीच्या अनेक तांत्रिक बाबींची माहिती झाली.
      अत्यंत उत्साही आणि निर्व्यसनी शेतकरी अशी टलुरामजीची प्रतिमा आहे .आपल्या सामाजिक बांधीलकिचेही भान ठेवून ते कोणत्याही शेतकर्यांच्या मदतीला धावून जातात . ट्रक्टरद्वारे सेवा पुरवतात. त्यांच्या या प्रगतीमुळे पांजरा गावच नव्हे तर पंचक्रोशीत त्यांच्या शेतीची चर्चा होत आहे.  Print


News - Gondia | Posted : 2019-10-11


Related Photos