महत्वाच्या बातम्या

 हिंदुस्थान जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून हिंदुस्थानातील वायू प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार हिंदुस्थान हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रदुषित देश असल्याचे समोर आले आहे.

IQR या स्वित्झरर्लंडमधील संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. हिंदुस्थान सोबत या यादित पहिल्या क्रमांकावर बांगलादेश व दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आहे.

या संस्थेच्या जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२३ या मध्ये १३४ देशांची यादी आहे. यात हिंदुस्थान पहिल्या क्रमांकावर आहे. तर शहरांनुसारच्या यादीत हिंदुस्थानातील बेगुसराय हे शहर जगातील प्रथम क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. २०२२ मध्ये हिंदुस्थान हा जगातील आठवा सर्वाधिक प्रदूषित देश होता.

२०२३ मधील जगातील सर्वाधिक प्रदूषित पाच देश -

बांगलादेश
पाकिस्तान
हिंदुस्थान
ताजिकिस्तान
बुर्किनो फासो





  Print






News - World




Related Photos