महत्वाच्या बातम्या

 मुंबई शहर जिल्ह्यासाठी १२ हजार ५०० कर्मचारी : २५ लाख मतदारांसाठी प्रशासनाकडून तयारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : मुंबई शहर जिल्हांतर्गत येणाऱ्या मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी २४ लाख ४६ हजार ८८ पात्र मतदार आहेत. या सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

या दोन मतदारसंघांत तब्बल २५ हजार ०९ इतकी मतदान केंद्रे असून, त्यासाठी १२ हजार ५०० हजार अधिकारी आणि कर्मचारी सज्ज ठेवले जाणार असल्याची माहिती यादव यांनी दिली.

मुंबई शहर जिल्ह्यात २४ लाख ४६ हजार ८८ मतदार पात्र आहेत. त्यापैकी १३ लाख २१ हजार ७८२ पुरुष, तर ११ लाख २४ हजार ८४ महिला आहेत. तृतीयपंथी मतदार २२२ आहेत. या जिल्ह्यात १७ हजार ७२६ नवमतदारांची नोंदणी झाल्याची माहितीही यादव यांनी दिली.

१८ वर्षे वयोगटातील नवमतदार :
एकूण : १७ हजार ७२६
तरुण : ९ हजार ८७६
तरुणी : ७ हजार ८५०

२० ते २९ वयोगटातील मतदार :
एकूण : २ लाख ९१ हजार ५०२
तरुण : १ लाख ६१ हजार ६९४
तरुणी : १ लाख २९ हजार ७३७

दिव्यांग मतदार :
एकूण मतदार : ५,०९३
पुरुष : ३,०३२
महिला : २,०६१

मतदान केंद्रे अशी :
१) एकूण मतदान केंद्र २५,००९
२) सहायकारी मतदान केंद्र ८
३) सखी महिला मतदान केंद्र ११
४) नवयुवकांनी चालविण्याचे मतदान केंद्र ११
५) दिव्यांग यांनी चालविण्याचे मतदान केंद्र ८





  Print






News - Rajy




Related Photos