महत्वाच्या बातम्या

 ऑटो चालविताना अपघात झाल्यास मिळणार ५० हजार रुपये


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : ऑटो-रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय अखेर शनिवारी सरकारने घेतला. हे मंडळ स्वायत्त व स्वयंपूर्ण व्हावे यासाठी शासनाकडून एकवेळचे अनुदान ५० कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, ऑटो चालविताना अपघात होऊन दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजनेतून ५० हजार रुपये ऑटोचालकाला मिळणार आहे.

विविध ऑटोरिक्षा संघटनेसह आॅटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती व विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनने आॅटो-रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी लावून धरली होती. दरम्यानच्या काळात आंदोलनही केले होते. अखेर निवडणूकीच्या तोंडावर या मंडळाला मंजुरी देण्यात आली. - परिवहन मंत्री असणार अध्यक्ष

राज्यस्तरीय कल्याणकारी मंडळाचे परिवहन मंत्री अध्यक्ष असणार आहे. सदस्य म्हणून परिवहन आयुक्त, अशासकीय सदस्यांमध्ये नोंदणीकृत आॅटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक यांच्या संघटनेचे दोन प्रतिनिधी, सदस्य सचिव म्हणून सह किंवा अपर परिवहन आयुक्त असतील. तर जिल्हास्तरीय कल्याणकारी मंडळात अध्यक्ष म्हणून त्या-त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सदस्य म्हणून पोलीस उपायुक्त (वाहतूक) किंवा अपर पोलीस अधीक्षक, अशासकीय सदस्य म्हणून नोंदणीकृत आॅटो-रिक्षा मिटर्ड टॅक्सी चालक यांच्या संघटनेचे प्रतिनिधी व सदस्य सचिव म्हणून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी असणार आहेत. या मंडळाच्या कामकाजाबाबतची नियमावली लवकरच तयार होणार आहे.

 हे आहेत फायदे : 
- जीवन विमा व अपंगत्व विमा योजना
- आरोग्य विषयक लाभ
- कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य
- पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
- कामगार कौशल्य वृद्धी योजना





  Print






News - Nagpur




Related Photos