महत्वाच्या बातम्या

 महिला बचत गटांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रास्त भाव दुकानांचे परवाने वाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातर्गत जिल्हातील ११ महिला बचत गटांना रास्त भाव दुकानांचे परवाने मंजूर करण्यात आले आहेत. संघर्ष शेतकरी महिला बचतगट, अजिमाबाद,परमात्मा एक महिला बचत गट, पालगाव, साफल्य महिला स्वयंसहाय्यता समूह, खोकरला, सृष्टी महिला बचतगट, मुक्ताई महिला बचतगट, रिद्धी- सिद्धी महिला बचत गट, सुखकर्ता महिला बचत गट,सिद्ध-साई स्वयं सहायता महिला बचतगट, दुर्गा महिला स्वयं सहायता बचत गट, सेंद्री बु, भिमाई महिला बचत गट, चीचाळ,वरील रास्त भाव दुकाने मंजूर केलेल्या बचत गटातील ११० महिलांना रोजगार उपलब्ध झाले आहे. 

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी उपस्थित होते.





  Print






News - Bhandara




Related Photos