महत्वाच्या बातम्या

 खर्च दर निश्चिती समिती राजकीय पक्षा सोबत बैठक


- राजकीय पक्षांना दिली आदर्श आचारसंहितेबाबत बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक खर्च दरनिश्चीती समितीची राजकीय पक्षांच्या प्रतिनीधीसोबत घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह उपजिल्हाधिकारी निवडणुक प्रशांत पिसाळ, आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अतिरीक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, तसेच खर्च निंयत्रण समिती नोडल जि.प कॅफो संतोष सोनी तसेच माध्यम प्रमाणीकरण नोडल जिल्हा माहिती अधिकारी शैलजा दांदळे उपस्थित होते.

यावेळी दर समितीने गठीत केलेले प्रचार साहित्य तसेच वाहन आणि उमेदवारांव्दारे करावयात येणाऱ्या विविध बाबींचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. तसेच दरांच्या बाबतीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनीधींनी त्यांचे म्हणणे मांडले ते लक्षात घेऊन दर निश्चीत समीतीने संबंधित बाबींची नोंद घ्यावी, असे कुंभेजकर यांनी निर्देशीत केले.

यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ९५ लक्षापर्यत खर्च मर्यादा असून त्यासाठी उमेदवाराचे राष्ट्रीयकृत बॅकेत खाते काढणे गरजेचे असल्याचे निवडणुक अधिकारी यांनी सांगितले.

बैठकीत विविध प्रकारच्या निवडणूक खर्चाबाबत बैठकीत विविध प्रकारच्या निवडणूक खर्चाबाबत बाबनिहाय आढावा घेण्यात आला.

यानंतर अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी आदर्श आचारसंहिताबाबत सविस्तर माहितीचे सादरीकरण केले. आदर्श आचारसंहितेचे  पालन करून राजकीय पक्षांनी देखील सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या बैठकीला आपचे चंचल साळवे, बसपाचे यशवंत वैदय, भाजपचे प्रतिनीधी आशिष गोंडाणे, भाजप ओबीसी मोर्चाचे महेंद्र निबांर्ते, कॉग्रेस कमीटीचे विनीत देशपांडे, सुनील सुखदेवे, तसेच मनसेचे नितीन खडीकर, शिवसेनेचे अनील गायधने, शिवसेना ठाकरे गटाचे संजय रेहपाडे, ॲङ. रवि वाढई तसेच अरविंद पडेाळे, राष्ट्रवादीचे नाना पंचबुध्दे, किरण अतकरी, अजय मेश्राम, दिलीप सोनुले तसेच बीजेपीचे एन. एम. घाटे, एनसीपीचे पी.पी लोढे, आर.एल.नागरे उपस्थित होते.





  Print






News - Bhandara




Related Photos