महत्वाच्या बातम्या

 बार्टीचे आयबीपीएस स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरु आयबीपीएस प्रशिक्षणाने करिअर घडवण्याची संधी : डॉ. सिध्दार्थ गायकवाड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : बार्टी प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या आयबीपीएस स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र तुम्हाला तुमचे करिअर घडवण्याची संधी देत आहे. सहा महिन्याच्या या प्रशिक्षणात आपले लक्ष केंद्रीत केल्यास तुम्ही आपले अपेक्षित लक्ष्य साध्य करु शकता. अभ्यासात आपले शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी केले.

सामाजिक न्याय भवन येथे बार्टीच्या आयबीपीएस स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके उपस्थित होते.

शिक्षण हे एकमेव माध्यम आहे जे आपल्याला यशाकडे घेऊन जाते. ती संधी बार्टीचे हे आयबीपीएस स्पर्धा प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करुन देत आहे. असे राजेश खवले यांनी आपल्या मनोगतात सांगितले. विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणारे हे अशा प्रकारचे हे पहिलेच केंद्र असल्याचे त्यांनी सांगितले. नियमित अभ्यास आणि लिहण्याचा जास्तीत जास्त सराव झाल्यास अधिक माहिती लक्षात राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची रुपरेषा समजावून सांगितली. अनिल वाळके यांनी प्रस्ताविकेत विद्यार्थांना प्रशिक्षणा बद्दलची माहिती दिली. विद्यार्थ्यांकडून अपेक्षित मार्गदर्शक तत्वे समजावून सांगितले. चांगले शिक्षण हा चांगल्या भविष्याचा पाया आहे. बार्टी चांगले शिक्षण देण्यास प्रतिबध्द असल्याचे त्यांनी सांगीतले.

केवळ प्रशिक्षणात दाखला घेऊन यश मिळू शकत नाही, ते यश पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करायची तयारी हवी. आणि या सहा महिन्याच्या काळात तुम्हाला हे सिध्द करुन दाखवायचे आहे. समाजिक न्याय भवनात प्रशिक्षण होत असल्याने येथे तुम्हाला अधिक जवाबदारीने वागायचे असल्याचे सुकेशनी तेलगोटे यांनी समजावून सांगीतले.

बार्टीचे आयबीपीएस प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी समाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, निबंधक इंदिरा असवार यांचे विशेष प्रयत्न राहीले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प अधिकारी सुनीता झाडे, प्रकल्प समन्वयक खुशाल ढाक, नागेश वाहुरवाघ सहाय्यक प्रकल्प अधिकारी सरीता महाजन यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकल्प अधिकारी शीतल गडलिंग तर आभार प्रकल्प अधिकारी तुषार सुर्यवंशी यांनी मानले.





  Print






News - Nagpur




Related Photos