विभागीय चाचा नेहरु बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : महिला व बाल विकास विभागाच्या वतीने १२ ते १४ मार्च या कालावधीत विभागीय चाचा नेहरु बाल क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला व बाल विकास विभाग यांच्या वतीने हा महोत्सव ग्रामीण पोलीस मुख्यालय परिसर, नारी रोड नागपूर येथे होणार आहे.
या महोत्सवाचे उदघाटन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्याहस्ते होणार असून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. नुतन रेवतकर, डॉ. माधवी मार्डीकर, शिल्पा खरपकर, डॉ. प्रेमा लेकुरवाळे यांची प्रमुख उपस्थित असणार आहे.
बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी या महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या विभागीय उपायुक्त अपर्णा कोल्हे यांनी केले आहे.
News - Nagpur