महत्वाच्या बातम्या

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ २६७ उमेदवारांना देणार प्रशिक्षण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील कुटुंबाची सामाजिक, आर्थिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने  उपलब्ध व्हावीत यासाठी  समाजातील गरजूंना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी चालू आर्थिक वर्षासाठी नागपूर जिल्ह्यासाठी २६७ प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण योजनेचे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. इच्छूक अर्जदारांनी महामंडळाच्या विहित नमुन्यात अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बी. विंग, रु.क्र.३०२ साउथ अंबाझरी रोड नागपूर येथे सादर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

अर्जासोबत लागणारी कागदपत्रे : 
अर्जदाराचा जातीचा दाखला (सक्षम अधिकाऱ्यांकडून),कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न मर्यादा ३ लाखांपर्यंत, तहसीलदारांकडून) ३) नुकताच काढलेला पासपोर्ट साईझ फोटोच्या दोन प्रती जोडावा. राशनकार्ड झेराक्स प्रती, आधारकार्ड झेराक्स प्रती, मतदान कार्ड,मोबाईल क्रमांक (आधारकार्ड लिंक), अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, प्रशिक्षणार्थी मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील असावा. प्रशिक्षणार्थी राज्यातील रहिवासी असावा. प्रशिक्षणार्थीचे वय १८ ते ५० वर्षे असावे. प्रशिक्षणार्थीने यापूर्वी शासनाच्या व महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. प्रशिक्षणार्थीने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा.





  Print






News - Nagpur




Related Photos