महत्वाच्या बातम्या

 पोलीस वाटर स्पोर्ट्स स्पर्धा २०२३-२४ मध्ये गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकाऱ्याने पटकावले सुवर्ण पदक  


- आरमोरी येथे कार्यरत असलेले पोउपनि संतोष कडाळे यांची यशस्वी कामगिरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्हा माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशिल जिल्हा असून गडचिरोली पोलीस दलातील पोलीस जवान हे या दुर्गम-अतिदुर्गम भागात आपली सेवा बजावत विविध कलागुण जोपासत असतात.

०२ ते ०८ मार्च २०२४ दरम्यान जम्मु काश्मीर पुलीस द्वारा आयोजित श्रीनगर येथे सुरु असलेल्या २३ व्या अखिल भारतीय पोलीस वाटर स्पोटर्स स्पर्धा २०२३-२४ मध्ये गडचिरोली पोलीस दलातील पोस्टे आरमोरी येथील कार्यरत असलेल्या पोउपनि संतोष कडाळे यांनी अतिशय थंड (-१°ते -४°) इतक्या कमी तापमानात अतिशय कमी ऑक्सीजन मध्ये खेळल्या जाणाऱ्या Coxless Four १००० मीटर या क्रिडा प्रकारात महाराष्ट्र पोलीस संघाचे नेतृत्व करत सुवर्ण पदक प्राप्त केले. 

पोउपनि संतोष कडाळे यांच्या या यशस्वी कामगिरी करिता अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक अहेरी  एम. रमेश यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos