दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी फिरते भरारी पथक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी -मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. तसेच आय.टी. व जी.के. विषयाची आनलाईन परीक्षा २० मार्च ते २३ मार्च तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र लेखी परीक्षा १ मार्च ते २६ मार्च कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांसाठी फिरते भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे.
पथकामध्ये सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. प्रत्येक पथकामध्ये महिला कर्मचाऱ्यांसह तीन कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. परीक्षा संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे व परीक्षा केंद्रावर कोणतेही गैरप्रकार होऊ नये यासाठी या पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
News - Nagpur