नागपूर येथील जिल्हा न्यायालयातील शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर
: न्यायालयात दाखल प्रकरणात सेटलमेंट करून देतो म्हणून लाचेची मागणी करणारा जिल्हा न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरणमध्ये कार्यरत शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
अब्दुल सलीम अब्दुल जब्बार  (४५)    जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सहावा माळा, रुम नंबर ६०५ असे आरोपी शिपायाचे नाव असून ४ हजार रूपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.  यातील तक्रारदार  सुर्यकेतु नगर खातरोड भंडारा येथील रहीवासी असुन तो संगणक दुरूस्तीचे काम करतो. त्याचे   २०१३  मध्ये लग्न झाले.  तक्रारदार व त्याच्या आई वडीलांविरूध्द् त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे कामठी येथे कलम ४९८ अ भा.दं.वि प्रमाणे गुन्हा नोंद असुन तपासाअंती त्यांच्याविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कामठी यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. तक्रारदार   २०१३ पासुन कामठी येथील न्यायालयात तारखेवर जात होते. त्या दरम्यान त्यांची ओळख कामठी न्यायालयात कार्यरत असलेला आरोपी   शिपाई अब्दुल सलीम अब्दुल जब्बार सोबत झाली. कोर्टातील कोणतेही काम असेल तर मला सांग मी ते करुन देईल तसेच तुझ्या प्रकरणाची  सेटलमेंट सुध्दा मी करुन देतो असे   अब्दुल हा तकारदाराला नेहमी म्हणत असे. त्यानंतर मध्यंतरी अनेकवर्ष तक्रारदारास कोर्टाचे कुठलेही समन्स आले नाही किंवा तारीख सुध्दा झाली नाही. सुमारे सात-आठ महिण्यापुर्वी पासुन आरोपी   अब्दुल हा तक्रारदारास वांरवार फोन करुन पैशांची मागणी करायचा व न दिल्यास  कुटुंबीयांविरूध्द वाॅरंट काढण्याची धमकी द्यायचा. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. शहनिशा करून आज सापळा रचून शिपाई अब्दूल याला रंगेहात अटक करण्यात आली.
सदर  कार्यवाही पोलीस अधीक्षक   रश्मी नांदेडकर,  अपर पोलीस  राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक  संदीप जगताप, पोलिस निरीक्षक गोरख कुंभार  , पोहवा सुनील कळंबे, नापोशि रविका तडहाट, लक्ष्मण परतेकी, चालक वकील शेख  यांनी केली आहे.

   Print


News - Nagpur | Posted : 2019-09-25


Related Photos