महत्वाच्या बातम्या

 अनाथ बालकांसाठी शासन सुविधा पंधरवड्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : अनाथ बालकांना विविध दाखले तसेच शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत ५ मार्चपर्यंत अनाथ बालकांसाठी शासन सुविधा पंधरवडा राबविण्यात येणार आहे.

या पंधरवड्यात महसूल विभागाच्या समन्वयाने जिल्ह्यातील अनाथ बालकांना आधार कार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला, अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला तसेच पात्र लाभार्थ्यांस मतदान कार्ड आदींचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामध्ये समर्पित कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी समर्पित कक्षातील सचिन वाटगुळे व अन्सार शेख यांचे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos