महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल


- दिवाळीपूर्वीच आटोपणार रणधुमाळी 
वृत्तसंस्था /  नवी दिल्ली :
संपूर्ण देशाला उत्सुकता लागलेल्या महाराष्ट्र, हरयाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा अखेर झाली आहे. त्यानुसार महाराष्ट्र आणि हरयाणा दोन्ही विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दोन्ही निवडणुकांचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार आहे. 
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. दिवाळीपूर्वी निवडणुकीचा निकाल लागून नवं सरकार स्थापन होणार आहे.  केंद्रीय निवडणूक आयोगानं आज शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दोन्ही राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. ९ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे. महाराष्ट्रात ८.९४ कोटी मतदार आहेत. विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.
  Print


News - World | Posted : 2019-09-21


Related Photos