गोंदिया जिल्ह्यातील गोसाईटोला येथील ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया :
मोरी बांधकामाचे देयक काढून देण्याच्या कामासाठी कंत्राटदाराकडून दोन हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.जिल्हा परिषद   चे प्रल्हाद रूपचंद चौधरी ग्रामपंचायत गोसईटोला ता. आमगाव जि. गोंदिया असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे. 
 यातील तक्रारदार हे गोसाईटोला येथील रहीवासी असुन तक्रारदार हे ठेकेदारीचे काम करतात. तक्रारदाराने २०१८ - १९ या आर्थीक वर्षात गोसाईटोला ते नंगपुरा मार्गावर असलेल्या नाल्यावर मोरी बांधकामाचे घेतले होते. दिलेल्या मुदतीत सदर काम एकुण १७ मजुरांच्या मदतीने पुर्ण केले व केलेल्या कामाचे १ लाख ५९ हजार ४०० रूपयांचे देयक  मिळण्याकरीता तक्रारदार हे पंचायत समिती आमगांव येथील ग्रामसेवक प्रल्हाद रूपचंद चौधरी यांना भेटले.  त्यांनी गोसाईटोला ते नंगपुरा मार्गावर असलेल्या नाल्याच्या मोरी बांधकामाचे  धनादेश देण्याकरिता तक्रारदारास दोन हजार रूपये लाचेची मागणी केली.  याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथील अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया चे पोलीस निरीक्षक   शशिकांत पाटील यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहनिषा करून  आज १८ सप्टेंबर रोजी  सापळा रचला. ग्रामसेवक प्रल्हाद रूपचंद चौधरी याने २ हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने रंगेहात पकडले. ग्रामसेवक प्रल्हाद रूपचंद चौधरी यांचे विरूध्द पोलीस ठाणे आमगांव  येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. 
ग्रामसेवक   चौधरी यांच्या गोंदिया येथील निवासस्थानाची   झडती सुरू आहे. सदर  कार्यवाही पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर व अपर पोलीस अधीक्षक   राजेश  दुद्दलवार  , पोलीस उप अधीक्षक   रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शपात पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील,  स.फौ. विजय खोब्रागडे, शिवशंकर तुमडे, पोहवा राजेश शेंद्रे, नापोशि रंजीत बिसेन, नितीन रहांगडाले, राजेन्द्र बिसेन, डिगांबर जाधव, मनापाशि वंदना बिसेन, गिता खोब्रागडे व चालक शिपाई देवानंद मारबते यांनी केली आहे.

   Print


News - Gondia | Posted : 2019-09-18


Related Photos