खड्ड्यांना आले तलावाचे स्वरूप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी : 
चामोर्शी तालुक्यातील महत्वाचे ठिकाण असलेल्या आष्टी येथील आंबेडकर चौकातील रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून खड्डे दिवसेंदिवस मोठे होत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने खड्ड्यांना पावसाच्या पाण्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 
चामोर्शी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सध्या या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचुन असल्यामुळे या खड्डयांना तलावाचे रूप आले आहे. चौकात नेहमी  अवजड वाहनांची वर्दळ असते. अशा या वर्दळीच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून खड्ड्यातून वाहने काढतांना वाहनधारकाना कमालिचा त्रास सहन करावा लागत आहे . सदर खड्डेयुक्त तलावाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुर्णतः दुर्लक्ष दिसून येत असून सार्वजनिक बांधकाम विभागास याबाबत कोणतीही गरज नसल्याचे चित्र दिसून येत आहे.  चौकातील खड्डेयुक्त तलाव बुजवले जाईल का ? असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांकडे उपस्थित होत आहे.रस्त्यावरील खड्ड्यांची दुरूस्ती करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. परंतु सार्वजनिक विभागाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. खड्ड्यामय रस्त्यांवरून गाडी चालवत नेल्याने वाहनधारकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत.   या खड्यामळे रस्त्यांवर वाहणांची कोंडी होत असते.  छोटे वाहनधारक रस्ता ओलांडतांना खड्ड्याची चाचपणी करत आपले वाहन खड्डेयुक्त तलावातून पुढे घेत असतात. या खड्यांमुळे छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही.  या रस्त्याने अवजड वाहनांची नेहमी ये-जा सुरू असते.या अवजड वाहनधारकांमुळे रस्त्यांवर कोंडी होत असते.या खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहनधारकांना मार्ग शोधणे अवघड बनले आहे .सदर खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे अशी आष्टी वासियांची मागणी आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-18


Related Photos