महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


९ फेब्रुवारी महत्वाच्या घटना

१९०० : लॉन टेनिस या खेळातील डेव्हिस कप या करंडकाची सुरूवात झाली.

१९३३ : साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.

१९५१ : स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.

१९६९ : बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.

१९७३ : बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.

२००३ : संगीतकार रवींद्र जैन यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

९ फेब्रुवारी जन्म

१४०४ : शेवटचा बायझेंटाईन सम्राट कॉन्स्टन्टाईन (अकरावा) यांचा जन्म.

१७७३ : अमेरिकेचे ९वे अध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १८४१)

१८७४ : स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९२६ – नाशिक)

१९१७ : गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार होमी जे. एच. तल्यारखान यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून १९९८)

१९२२ : इंग्लिश क्रिकेट खेळाडू जिम लेकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९८६)

१९२२ : भारतीय उद्योगपती लीला पॅलेस हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चे संस्थापक सी. पी. कृष्णन नायर यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे २०१४)

१९२९ : महाराष्ट्रचे ८वे मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर २०१४)

१९७० : ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांचा जन्म.

९ फेब्रुवारी मृत्यू

१८७१ : रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ फ्योदोर दोस्तोवस्की यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८२१)

१९६६ : बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक दामूअण्णा जोशी यांचे निधन.

१९७९ : चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९१०)

१९८१ : न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचे निधन. (जन्म: ३० सप्टेंबर १९००)

१९८४ : भरतनाट्यम नर्तिका तंजोर बालसरस्वती यांचे निधन. (जन्म: १३ मे १९१८)

२००० : चित्रपट अभिनेत्री व निर्माती शोभना समर्थ यांचे निधन.

२००१ : माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल दिलबागसिंग यांचे निधन.

२००८ : कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९१४)





  Print






News - todayspecialdays




Related Photos