महत्वाच्या बातम्या

 केंद्र सरकारकडून वार्षिक उत्पन्नासंदर्भातील आकडेवारी जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : नोकरदार वर्गासाठी दरवर्षी होणारी पगारवाढ अतिशय महत्त्वाची असून ही पगारवाढ गेल्या काही वर्षांमध्ये नोकरदार वर्गाची आणि बहुविध मार्गांनी कमाई करणाऱ्यांची खऱ्या अर्थाने भरभराट करून गेली आहे असे म्हणने गैर ठरणार नाही.

संसदेत केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीवरून हेच स्पष्ट होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भारतात श्रीमंतांचा आकडा वाढत असून, मागील आर्थिक वर्षामधील आयकर फायलिंगमुळे  हीच बबा स्पष्ट होत आहे.

केंद्राकडून संसदेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार देशभरात सध्या १ कोटी रुपयांहून अधिक कमाई करणाऱ्यांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्यामुळे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत देशातील कोट्यधीशांची संख्या २.१६ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या कमाईचे आकडे पाहता सुस्थितीत असणारी आणि समाधानकारक वेतन देणारी नोकरी, व्यवसाय क्षेत्रातील प्रगती असे अनेक घटक अधोरेखित होत आहेत. तुम्हीही या आकडेवारीचाच एक भाग आहात ही बाबसुद्धा येथे नाकारता येत नाही.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत देशाच्या वार्षित उत्पन्नातील वाढीला आकडा जाहीर केला. यासोबत त्यांनी आपल्या अर्थार्जनाची संपूर्ण माहिती केंद्राला देणाऱ्यांचा आकडाही त्यांनी जाहीर केला. देशातील नागरिकांची अर्थार्जनाची क्षमता वाढणं आणि श्रीमंतांचा एकूण आकडा वाढणे ही बाब देशाच्या विकासदर वाढीकडे खुणावत आहे. महत्त्वाचे म्हणजे ही क्रिया सातत्याने सुरु राहिल्यास देशातील श्रीमंतांचा आकडा येणाऱ्या दर वर्षागणिक वाढता राहणार आहे हे या आकडेवारीतून स्पष्ट झाले.

देशातील कोट्यधीशांचा आकडा -

असेसमेंट इयर २०२३- २४ मध्ये आयकरासंबंधीची सविस्तर माहिती देणाऱ्यांची एकूण संख्या ७.४१ कोटी इतकी होती. राज्यमंत्र्यांच्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०२२- २३ मध्ये १ कोटी आणि त्याहून अधिक उत्पन्न आसणाऱ्यांचा आकडा १ लाख ८७ हजार इतका होता. पण, मून्यांकन वर्ष अर्थात असेसमेंट इयर २०२३- २४ मध्ये १ कोटी आणि त्याहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांचा आकडा मोठ्या फरकानं वाढून २ लाख १६ हजार वर पोहोचला आहे. कोट्यवधींची कमाई करणाऱ्यांचा आकडा वाढत असल्याचे सांगताना राज्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून भरण्यात आलेल्या आयकराची आकडेवारीसुद्धा जाहीर केली.





  Print






News - World




Related Photos