महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


७ फेब्रुवारी महत्वाच्या घटना

१८५६ : ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले. सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.

१९१५ : गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील आर्यन हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्‍याची अंगठी.

१९२० : बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी ने तयार केलेला सैरंध्री हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.

१९४८ : कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.

१९६५ : मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.

१९७१ : स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.

१९७४ : ग्रेनाडा हा देश युनायटेड किंग्डमपासुन स्वतंत्र झाला.

१९७७ : सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.

१९९९ : युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी विराजमान.

२००३ : क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.

७ फेब्रुवारी जन्म

१६९३ : रशियाची सम्राज्ञी ऍना यांचा जन्म.

१८०४ : डिरे अँड कंपनीचे संस्थापक जॉन डिरे यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १८८६)

१८१२ : इंग्लिश कादंबरीकार व लेखक चार्ल्स डिकन्स यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १८७०)

१८७३ : आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस अॅन्ड्रयूज यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल१९१२)

१९०६ : रशियन विमानशास्त्रज्ञ अँतोनोव्ह एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक ओलेग अँतोनोव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९८४)

१९३४ : चित्रपट अभिनेता व निर्माता सुजित कुमार यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी २०१०)

१९३८ : कम्युनिस्ट नेते एस. रामचंद्रन पिल्ले यांचा जन्म.

७ फेब्रुवारी मृत्यू

१३३३ : निचिरेन शोषु बौद्ध धर्माचे संस्थापक निक्को यांचे निधन.

१९३८ : अमेरिकन उद्योजक हार्वे फायरस्टोन यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १८६८)

१९९९ : जॉर्डनचे राजे हुसेन यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३५)





  Print






News - todayspecialdays




Related Photos