महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२४ जानेवारी महत्वाच्या घटना

१८४८ : कॅलिफोर्निया गोल्डरश – कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले.

१८५७ : दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.

१८६२ : बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली.

१९०१ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.

१९१६ : नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला.

१९४२ : दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी बँकॉकवर बॉम्बहल्ला केला. यामुळे थायलँडला इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणे भाग पडले.

१९४३ : पुण्यातील कॅपिटॉल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट होऊन चार जण ठार.

१९६६ : भारताच्या तिसर्‍या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला.

१९६६ : एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले.

१९७२ : गुआममध्ये इ. स. १९४४ पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. त्याला दुसरे महायुद्ध संपलेले माहितीच नव्हते.

१९७६ : बर्मा शेल या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव भारत रिफायनरीज असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून भारत पेट्रोलियम (BPCL) असे करण्यात आले.

१९८४ : अ‍ॅपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटर्सची विक्री सुरू झाली.

१९५० : भारताच्या संविधानावर स्वाक्षरी झाली

२४ जानेवारी जन्म

१९२४ : तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे यांचा जन्म. (मृत्यू: २८ डिसेंबर २००० – मुंबई)

१९२४ : मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७१)

१९४३ : हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक सुभाष घई यांचा जन्म.

२४ जानेवारी मृत्यू

१९६५ : दुसर्‍या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते विन्स्टन चर्चिल यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८७४)

१९६६ : एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळुन भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा मृत्यूमुखी पडले. (जन्म: ३० ऑक्टोबर १९०९)

२००५ : गोवा मुक्तिसंग्राम अनुताई लिमये यांचे निधन.

२०११ : शास्त्रीय गायक स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १९२२)





  Print






News - todayspecialdays




Related Photos