महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


९ जानेवारी महत्वाच्या घटना

१७६० : बरारीघाटच्या लढाईत अहमद शाह दुर्रानी यांनी मराठ्यांचा पराभव केला.

१७८८ : कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५वे राज्य बनले.

१८८० : क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्यांना तेहरान जहाजाने एडनला नेण्यात आले.

१९१५ : महात्मा गांधी अफ्रिकेतुन भारतात आले.

२००१ : नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.

२००१ : नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.

२००२ : भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्ध एकदिवसीय मालिका जिंकली.

२००२ : महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.

२००७ : स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.

९ जानेवारी जन्म

१९१३ : अमेरिकेचे ३७वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल १९९४)

१९१८ : मार्क्सवादी विचारवंत लेखक प्रभाकर उर्ध्वरेषे यांचा जन्म.

१९२२ : जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हर गोबिंद खुराना यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०११)

१९२६ : चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९९७ – मुंबई)

१९२७ : सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक आणि समीक्षक रा. भा. पाटणकर यांचा जन्म.

१९३४ : पार्श्वगायक महेंद्र कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर २००८ – मुंबई)

१९३८ : गणिती चक्रवर्ती रामानुजम यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९७४)

१९५१ : ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य पं. सत्यशील देशपांडे यांचा जन्म.

१९६५ : नृत्यदिग्दर्शक फराह खान यांचा जन्म.

९ जानेवारी मृत्यू

१८४८ : जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ कॅरोलिन हर्षेल यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १७५०)

१९७३ : फ्रांसचे पहिले अध्यक्ष लुई-नेपोलियन बोनापार्ट उर्फ नेपोलियन ३रा यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८०८)

१९२३ : पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: १ जून १८४२)

२००३ : गीतकार व कवी कमर जलालाबादी यांचे निधन.

२००४ : पखवाज वादक शंकरबापू आपेगावकर यांचे निधन.

२०१३ : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ जेम्स बुकॅनन यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर१९१९)





  Print






News - todayspecialdays




Related Photos