महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना सैनिकी विद्यालयात एन.डी.आर.एफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण


विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात ५ जानेवारी ला एन.डी.आर.एफ (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला तर्फे विद्यालयातील जवळपास २०० विद्यार्थ्यांना आपत्ती निवारणाचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले. एन.डी.आरएफ जवानांचे कार्य आपत्तीनंतरची परिस्थिती नियंत्रित करणे किंवा पीडितांना मदत करणे इतकेच मर्यादित नाही. ते आपत्तीपूर्वीचा धोक्याचा इशारा देण्यासाठी डिझास्टर अलर्ट सिस्टम विकसित करतात. हे जवान आपत्तीच्या काळात सरकारी यंत्रणेला मदत करतात, असे मार्गदर्शन इन्स्पेक्टर पंकज चौधरी यांनी केले विद्यालयामध्ये एन.डी.आर.एफ दलाच्या माध्यमाने विविध नैसर्गिक किंवा मानवी संकटावर कशारितीने मात करावे या संदर्भात मार्गदर्शन केले शिवाय सर्व विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीत घाबरून न जाता संकटात सापडलेल्या व्यक्तीला कश्या प्रकारे मदत करायला पाहिजे याचे प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखविले. 


प्रात्यक्षिके करून दाखविताना एन.डी.आर.एफ दलाचे हवालदार रामकृष्ण शेळके, हवालदार शरद पवार, केतन देशमुख, यांच्या सहकार्याने संपूर्ण विद्यार्थ्यांना पूर, दुष्काळ, भूकंप, उष्णकटिबंधीय चक्रीवादळ, विजा, त्सुनामी, ज्वालामुखी क्रियाकलाप, जंगलातील आग. इत्यादी पासून स्वताचे अथवा इतरांचे प्राथमिक बचाव कसे करावे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.


प्रसंगी  विद्यालयाला एन.डी.आर.एफ तर्फे किट सुद्धा पुरविण्यात आली. या वेळी एखाद्या व्यक्तीला हृदयाचा झटका आल्यास त्याला सुरुवातील कश्या रीतीने सी.पी.आर दयायला पाहिजे हे समजावून सांगितले कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे पर्यवेक्षक अजय वानखेडे सैनिकी निदेशक ऋषी वंजारी व नामदेव प्रधान हे होते संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन रहीम पटेल यांनी केले. 







  Print






News - Gadchiroli




Related Photos