महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


५ जानेवारी महत्वाच्या घटना

१६६४ : छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला.

१६७१ : छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून साल्हेर काबीज केले.

१८३२ : दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.

१९९९ : द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.

१९२४ : महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी खुले केले.

१९३३ : सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरूवात झाली.

१९४८ : वॉर्नर ब्रदर्स यांनी रोझ बाऊल फुटबॉल स्पर्धेच्या जगातील पहिल्या रंगीत सिनेमाचे प्रदर्शन केले.

१९४९ : पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.

१९५७ : विक्रीकर कायदा सुरू झाला.

१९७४ : अंटार्क्टिकामधील सर्वोच्‍च तापमानाची (१५º सेल्सिअस) नोंद झाली.

१९९७ : रशियाने चेचेन्यातुन सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.

१९९८ : ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

२००४ : संभाजी ब्रिगेड या जातीयवादी संघटनेच्या गुंड समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान. अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.

५ जानेवारी जन्म

१५९२ : ५वा मुघल सम्राट शहाजहान यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १६६६)

१८५५ : अमेरिकन संशोधक व उद्योजक किंग कँप जिलेट यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै १९३२)

१८६८ : मराठी संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू यांचा जन्म.

१८६९ : कन्नड साहित्यिक व्यंकटेश तिरको कुलकर्णी यांचा जन्म.

१८९२ : लेखक व मराठी भाषातज्ञ कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून १९६४ – मुंबई)

१९१३ : मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च २००७)

१९२२ : आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते मोहम्मद उमर मुक्री यांचा जन्म. (मृत्यू: ४ सप्टेंबर २०००)

१९२५ : मराठी साहित्यिक रमेश मंत्री यांचा जन्म.

१९२८ : मराठी साहित्यिक विजय तेंडूलकर यांचा जन्म.

१९४१ : भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९वे व शेवटचे नबाब मन्सूर अली खान पतौडी यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर २०११)

१९४८ : भारतीय क्रिकेटपटू पार्थसारथी शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर २०१०)

१९४८ : अभिनेत्री आणि गायिका फय्याज यांचा जन्म.

१९५५ : पश्चिम बंगालच्या ८ व्या व पहिल्याच महिला मुख्यमंत्री आणि तृणमूल पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा जन्म.

१९८६ : हिंदी चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा जन्म.

५ जानेवारी मृत्यू

१८४७ : कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ आणि गायक त्यागराज यांचे निधन.

१९३३ : अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष काल्व्हिन कूलिज यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १८७२)

१९४३ : अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १८६४)

१९७१ : भारतीय जादुगार पी. सी. सरकार यांचे निधन.

१९८२ : भारतीय संगीतकार रामचंद्र चितळकर उर्फ सी. रामचंद्र यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९१८)

१९९० : चित्रपट निर्माते व दिग्दर्शक रमेश बहल यांचे निधन.

१९९२ : इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९१४)

२००३ : पखवाजवादक गोपालदास पानसे यांचे निधन.





  Print






News - todayspecialdays




Related Photos