महाडिबीटी पोर्टल : शिष्यवृत्ती वितरण उशीरा होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासुन शासनाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजुरीकरीता महाडिबीटी हि ऑनलाईन प्रणाली सुरु केली आहे. त्यानुसार शिष्यवृत्तीचे अर्ज पडताळणी प्रक्रियेमधील पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम ( PFMS) व नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया(NPCI )  यांच्या स्तरावर विलंब होत असल्याने शिष्यवृत्ती वितरणामध्ये विलंब होत असून, याबाबत स्थानिक विद्यार्थी, तसेच पालक संघटना यांना महाविद्यालय प्रशासनाने अवगत करुन आश्वासित करावे, अशा सुचना सहाय्यक आयुक्त गडचिरोली यांनी सर्व महाविद्यालयांना दिल्या आहेत. 
 विद्यार्थ्यांनी  महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर सहाय्यक आयुक्त स्तरावरुन विद्यार्थ्यांच्या अर्जाला ऑनलाईन मान्यता प्रदान केलेली आहे. समाज कल्याण आयुक्तालयाचे आयुक्त यांच्या स्तरावरुन विद्यार्थ्यांच्या अर्जाला मान्यता प्रदान केल्यानंतर शिष्यवृत्तीची रक्कम PFMS व NPCI  या केंद्रीभूत वितरण प्रणालीमधून विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या बॅक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते. परंतु, राज्य स्तरावरील PFMS व NPCI  यांच्या स्तरावरुन तपासणी प्रक्रियेत विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत समाज कल्याण आयुक्त पुणे मार्फत माहिती तंत्रज्ञान संचालनालयास वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. याबाबत जिल्हयातील सर्व कनिष्ठ,वरिष्ठ व व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अनुदानित व विनाअनुदानित महाविद्याल, प्रशासनाने स्थानिक सर्व विद्यार्थ्यांना व विद्यार्थी तसेच पालक संघटनांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही, यासाठी त्यांना याबद्दल कळवावे व आश्वासित करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली यांनी केले आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-13


Related Photos