घरात घुसून अपंग पतिसोमोरच केला त्या महिलेवर सामूहिक बलात्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंथा / आसाम : 
आसाममधल्या डिब्रुगडमध्ये बोकपारा येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका दिव्यांग पतीसमोरच तिच्या पत्नीवर तिघांनी आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केला आहे. या प्रकारानंतर परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दुपारच्या सुमारास गावात जास्त रहदारी नसल्याचा फायदा घेत हे तीन आरोपी पाणी पिण्याच्या बहाण्याने त्या महिलेच्या घरात घुसले आणि संधी साधत त्यांनी महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, ४० वर्षीय महिला घरात झोपलेली होती. तिन्ही आरोपींनी पाणी मागण्याच्या बहाण्याने महिलेचा दरवाजा ठोठावला. जेव्हा तिने दरवाजा उघडण्यास नकार दिला, त्यावेळी दरवाजा तोडून ते आत घुसले. त्यानंतर पतीसमोरच त्या तिघा नराधमांनी महिलेवर अमानुष अत्याचार केला. त्या महिलेचे घर हे गावातल्या शेवटच्या कोपऱ्यात आहे. त्यामुळे कोणीही तिच्या मदतीला धावून आले नाही. त्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केले. पोलिसांनी कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.   Print


News - World | Posted : 2019-08-12


Related Photos