महत्वाच्या बातम्या

 महानत्यागी बाबा जुमदेव यांचे जनकल्याण कार्य जन-जन पर्यंत पोचणे काळाची गरज : आ. विनोद अग्रवाल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : दीन दुबळे, गोर गरीबांच्या उद्धारासाठी आणि युवकांना व्यसनापासून दूर ठेवून संपूर्ण मानवतेचा परमेश्वर एक आहे. असा संदेश देणारे महान त्यागी बाबा जुमदेव यांचे कार्य मानवता धर्माचे  पालन करणारे आणि सर्व व्यक्तीविशेषला समान लेखणारा आहे. परमात्मा एक सेवक मंडळाचे जीवन जगण्याचे मार्ग आनंदी आणि सुखी आयुष्यासाठी आवश्यक आहे. याकरिता यांचे कार्य समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सदैव तत्पर राहून एक सेवक म्हणून कार्यरत राहीन असे मार्गदर्शन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले. ते ग्राम धामणगाव येथे आयोजित परमात्मा एक सेवक मासिक चर्चा बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. मानवतेचे विचार प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोचविण्यासाठी सेवक मंडळाचे कार्य नेत्रदीपक आहे. मरावे परी कीर्ती रुपी उरावे याचे जिवंत उदाहरण म्हणजे महान त्यागी बाबा जुमदेव आहेत. ते जरी आपल्यात नसले परंतु आज संपूर्ण देशात त्यांचे विचार प्रेरित करत आहेत. असेही आमदार विनोद अग्रवाल बोलत होते.

कार्यक्रमादरम्यान चिमुकल्या विद्यार्थिनींने लेझिमच्या माध्यमाने पाहुण्यांचे स्वागत केले. त्यांचे कौतुक करताना आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते त्यांना रोख आणि पुष्गुच्छ देवून गौरविण्यात आले.

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुन्नालाल मरठे, संध्या धर्मराज पाचे, विठ्ठल पारधी, सरपंच सरिता कावरे, उपसरपंच रामवंती खरे, पोलिस पाटील गोधन बाई टेंभरे, तंटामुक्ती अध्यक्ष होसलाल बाहे, ग्रा.प. सदस्य आनंद वासनिक, जयचंद कावरे, धर्मेंद्र बाहे, छाया रामटेके, कविता बागडे, प्रियांका पाचे, सत्यवती टेंभरे इत्यादी मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.





  Print






News - Gondia




Related Photos