आज मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा गडचिरोली जिल्ह्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : 
राज्यात भाजपा युती सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती जनतेला देण्यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा आज रविवार ४ ऑगस्ट रोजी  जिल्ह्यात येत असुन यात्रेची भारतीय जनता पार्टीच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.पावसाचे दिवस लक्षात घेता देसाईगंज व गडचिरोली येथे सभास्थळी भव्य वॉटरप्रुफ पेंडाल उभारण्यात आले आहेत.
 महाजनादेश यात्रा उद्या दुपारी ३ वाजता देसाईगंज शहरात येणार आहे.देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात  भव्य जाहीर सभा होणार आहे. यासाठी आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य वॉटरप्रुफ शामीयाना उभारण्यात आला आहे. महाजनादेश  यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्राचे नियोजन व वित्तमंत्री सुधिर मुनगंटीवार, गोंदिया - भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री  परिणय फुके, खा. अशोक नेते, आ. रामदास आंबटकर, आ. कृष्णा गजबे, गिरीश व्यास,आ.अनिल सोले, अरविंद सा.पोरेड्डीवार,प्रकाश सा.पोरेड्डीवार, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष  किसन नागदेवे, जि.प.चे कृषी सभापती नाना नाकाडे, मोतिलाल कुकरेजा, नगराध्यक्षा शालुताई दंडवते, आरमोरीचे नगराध्यक्ष पंकज नारनवरे,उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी आदी मान्यवर उपस्थित राहतील.
 या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना वाहन सुरळितपणे ठेवता येईल यासाठी  पंचायत समिती कार्यालयाच्या जुन्या ईमारतीचे आवार, नगर परिषद सांस्कृतीक भवनाचे प्रांगण, तहसिल कार्यालया  समोरील स्टेडियम या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा तालुकाअध्यक्ष राजू जेठानी, नगर सेवक नरेश विठ्ठलानी यांनी केले आहे.
देसाईगंज येथील सभा आटोपल्यानंतर ही महाजनादेश यात्रा देसाईगंजवरून ब्रम्हपुरी येथे जाईल.ब्रम्हपुरी येथे ४.१५ वाजता जाहीर सभा होईल
.या नंतर ही महाजनादेश यात्रा आरमोरीकडे मार्गक्रमण करेल. ही यात्रा आरमोरी येथे ६ वाजता पोहचेल. यावेळी या यात्रेचे  जंगी स्वागत आरमोरी येथील सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या निवासस्थानी होईल.यावेळी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ.कृष्णा गजबे यांनी केले आहे.

गडचिरोली येथे सायंकाळी ६.३० वाजता भव्य जाहीर सभा

 आरमोरी येथून महाजनादेश यात्रा गडचिरोलीकडे प्रयाण करेल.ही यात्रा गडचिरोली येथे पोहचल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता  धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानात भव्य वॉटरप्रुफ शामीयाना उभारण्यात आला आहे. तसेच पार्कींगचीही व्यवस्था करण्यात  आली आहे. गडचिरोली येथे होणाऱ्या जाहीर सभेचे नियोजन खा. अशोक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे पदाधिकारी करीत आहेत.  या जाहीर सभेला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खा. अशोक नेते,आ.डॉ.देवराव होळी तसेच भारतीय जनता पार्टीच्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-03


Related Photos