महत्वाच्या बातम्या

 जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते ईव्हीएम, व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेचा शुभारंभ


- जिल्ह्यात फेब्रुवारी अखेरपर्यंत चालणार अभियान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन, व्हीव्हीपँट जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते झाला.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनील गावित, तहसिलदार रमेश कोळपे, नायब तहसिलदार अतुल रासपायले उपस्थित होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदारांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन अर्थात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या पारदर्शकतेबाबत जनजागृती तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या अनुषंगाने ही मोहीम राबविली जात आहे.

ईव्हिएम मशीनबाबत असलेल्या शंका दुर करून मतदारांमध्ये त्याबाबतचा विश्वास निर्माण करण्याकरिता देखील मतदारांना माहिती देण्यात येत आहे. जिल्ह्यातील आर्वी, देवळी वर्धा व हिंगणघाट या चारही विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ईव्हीएम डेमो व सेंटर सुरू करण्यात आलेले आहेत. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता सदर मशिन या विविध गावांमध्ये सुध्दा जनजागृती करीता ठेवण्यात येणार आहे.

मोहीम कालावधीमध्ये गावोगावी एलएडी वाहनाद्वारे जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या संदर्भात तज्ञाद्वारे जनजागृती करून मतदारांचे प्रश्न व त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात येणार आहे. या ईव्हीएम डेमो सेंटर्सला नागरीकांनी विशेषत: नवयुवकांनी भेट देऊन मतदान करण्याची पध्दत समजून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos