मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर : 
यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिमसह मुंबईतील मलबार हिल किंवा मुलुंड  दोन मतदारसंघातून रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र मुख्यमंत्री फक्त एकाच म्हणजेच त्यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याचे स्वत: मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघ बदलाच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. 
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कोणत्या मतदारसंघातून कोण रिंगणात उतरणार याची चाचपणीही सुरु करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री नागपूर दक्षिण-पश्चिमसह मुंबईतील मलबार हिल किंवा मुलुंड या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे बोललं जात होतं. विदर्भाऐवजी महाराष्ट्राचा नेता अशी छबी निर्माण करण्याचा यावरुन प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. नागपूरच्या पारंपारिक मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांना निवडणूक लढवण्यास काहीही अडचण नाही. मात्र ते मुंबईतील कोणता मतदारसंघ निवडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात मुख्यमंत्र्यांसाठी मुंबईतील मलबार हिल हा मतदारसंघ सुरक्षित मानला जात आहे. कारण मतदारसंघाचं नेतृत्व सध्या मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा करत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी मुंबईतील मतदारसंघाचीही चाचपणी सुरु करण्यात आली होती.मात्र जर मुख्यमंत्र्यांना मुंबईतून निवडून आणायचं असेल, तर त्यांना मलबार हिल मतदारसंघातूनच रिंगणात उतरवण्याची शक्यता होती. मात्र अशा परिस्थितीत मंगल प्रभात लोढा यांचं पुनर्वसन कुठे करावं असा प्रश्न भाजपला पडला होता.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या पारंपारिक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण- पश्चिमच्या कार्यकर्त्यांच्या अभ्यास वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघ बदलाच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री नागपूरच्या पारंपारिक मतदारसंघातून लढणार असल्याने दक्षिण- पश्चिमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. दरम्यान यंदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री नागपूर मतदारसंघातून लढणार आहेत.    Print


News - Nagpur | Posted : 2019-07-29


Related Photos