महत्वाच्या बातम्या

 एचआयव्हीचा प्रसार कमी करण्यासाठी जनजागृती महत्वाची : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : एचआयव्हीवर कायमस्वरुपी इलाज नसला तरी या आजाराचा प्रसार कमी करण्यासाठी काळजी व दक्षता घेणे आवश्यक आहे. एचआयव्हीचा प्रसार कमी करण्यासाठी जनजागृती महत्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी एड्स जनजागृती कार्यक्रमात केले.

१ डिसेंबर या जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात ए्ड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज. पराडकर, उत्कर्षा जनकल्याण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभ्युदय मेघे, नोबल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रविण हिवरे,  वैद्यकिय जनजागृती मंचेचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नुरुल हक शेख आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना राहुल कर्डिले म्हणाले, एचआयव्ही बाधितांशी भेदभाव न करता  सन्मानाची वागणूक द्यावी. यावेळी त्यांनी जिल्हा एड्स व प्रतिबंध विभागाच्या कामाचे कौतुक सुध्दा केले. यावेळी विवेक देशमुख, डॉ. सचिन तडस, डॉ. रा.ज. पराडकर, अभ्युदय मेघे, प्रविण हिवरे यांनी सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

यावर्षीच्या एड्स जनजागृती कार्यक्रमाचे घोषवाक्य आता नेतृत्व व आघाडी समुदायांची वाटचाल एड्स संपविण्याच्या दिशेने आहे हे आहे. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्याहस्ते आरआरसी महाविद्यालयाच्या समन्वयकांना प्रशस्तिपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. दिव्यांनी थुल, विजय ओझा, अमित छल्लानी, ज्योत्सना गावंडे, नितीन साखरे, आनंद काळबांडे, माधुरी भोयर, सारिका ढोके, नितीन थुल, मुक्तार शेख, शुभांगी रेवतकर, सुचिता बोभाटे, वैशाली मैद, नोबल शिक्षण संस्था, उत्कर्ष जनकल्याण शिक्षण व विविध महाविद्यालय व वैद्यकीय जनजागृती मंचच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.





  Print






News - Wardha




Related Photos