हिमंत असेल तर पिक विमा कंपनीवर कारवाई करून दाखवा : ना. विजय वडेट्टीवार


- शिवसेनेवर  साधला निशाणा 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुल :
सत्तेत असताना सुद्धा शिवसेनेने पिकविमा कंपनीवर मोर्चा काढला. त्यांना मोर्चा काढण्याची गरजच काय ? यात नक्कीच मिलीभगत असून  शेतकऱ्यांप्रती हा फक्त देखावा आहे.   हिंमत असेल तर  पिक विमा कंपनीवर  कारवाई करून दाखवावे  असा सरळ निशाणा शिवसेनेवर  विधानसभेतील विरोधी पक्षनेता नामदार विजय वडेट्टीवार यांनी साधला. 
 मुल येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा व लोकार्पण सोहळाच्या निमित्ताने उद्घाटक म्हणून ते  बोलत होते. 
  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले मार्केट यार्ड मध्ये बांधलेल्या दोन ऑक्शन शेडचे लोकार्पण आणि शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार सुरेश धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.  या  शेतकरी मेळाव्याचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि माजी जि प अध्यक्ष संतोष रावत हे होते. 
 नामदार विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले , राज्यात ३० लाख शेतकरी कर्ज माफी पासून वंचित आहेत. पिक विम्याचा लाभ अजून शेतकऱ्यांना मिळाला नाही.राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना फक्त शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे,  असा आरोप त्यांनी यावेळी केला.  वनमंत्री जिल्ह्याचे असूनही वनपट्ट्या पासून शेतकरी वंचित आहे. घरकुलचा लाभ नाही.  आता यांना धडा शिकवण्याची वेळ आली असून आता महाराष्ट्रात परिवर्तन घडले पाहिजे   असे नामदार विजय वडेट्टीवार म्हणाले.  राज्यात १४७०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे . एकीकडे मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे.  या महागाईचा फटका सर्वसामान्य जनतेला आणि शेतकरी वर्गांना होत आहे. 
 राज्यात काँग्रेस पक्ष हा विचारांचा पक्ष असून सर्वधर्मसमभाव , सामाजिक समता , न्याय बंधुत्वा ने   पुढे जात आहे . त्यामुळे  राज्यात कांग्रेस पार्टीचे सरकार आल्यास शेतकरी वर्गाला सरसकट कर्जमाफी देऊ, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. 
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने  ना. विजय वडेट्टीवार , खासदार सुरेश धानोरकर आणि संतोष रावत यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला . 
 सत्काराला उत्तर देताना खा.  बाळू धानोरकर म्हणाले , जनतेच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही . ग्रामिण भागातील शेतकरी व जनतेचे प्रश्न सोडविण्यास मी कटिबद्ध आहे. संतोष रावत यांनीही आपले मनोगत सादर केले . यावेळी प्रगतिशील शेतकऱ्यांचा  मान्यवराच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. 
 प्रास्ताविक सभापती घनश्याम येनुरकर यानी  केले . संचालन संजय पडोळे आणि आभार संचालक संजय मारकवार यांनी मानले. कार्यक्रमास नंदू नागरकर, चित्रा डांगे , घनश्याम मुलचंदानी , दिनेश चोखारे , प्रकाश पाटील मारकवार , प्रकाश देवतळे आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, उपसभापती संदीप कारमवार संचालक संजय मारकवार , राकेश रत्नावार ,  राजेंद्र कन्नमवार , शांताराम कामडी  धनंजय चिंतावार किशोर पद्माकर विवेक बुरांडे मारोती चिताडे तथा सर्व संचालक , नगरसेवक ,कर्मचारी , शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमास्थळी संगीतकार आणि गायक संतोष कुमार यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-22


Related Photos