कुपोषण दूर करण्यासाठी प्रोटीन युक्त तांदुळ ? लोकांमध्ये संभ्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची :
तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात कृत्रिम तांदूळ दिसल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
रुखमन घाटघुमर रा.मोहगांव ( कोरची ) यांनी स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ विकत आणला.या तांदळामध्ये काही तांदुळ कृत्रिम असल्याचे दिसले.ते तांदुळ त्यांनी कोरचीतील काही लोकांना दाखविले. हुबेहूब नैसर्गिक तांदळासारखे पण जास्त चमक असणारे हे तांदूळ नैसर्गिक नाही असा लोकांचा विश्वास झाला.फायबर किंवा प्लास्टिक पासून तयार असावा असेच दिसतो. इतर तांदूळ शिजण्याआधीच हे तांदूळ फुगतात व भाताचा आकार मोठा असतो.
चिन देशातून प्लॅस्टिक चे तांदूळ बाजारात आले असून हे तांदुळ आरोग्यासाठी अपायकारक आहेत अशी अफवा लोकांमध्ये आधिच घर करून आहे. त्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तांदळाची शहानिशा करण्यासाठी काही कार्यकर्ते तहसील कार्यालयात गेले. ना.त.नारनवरे,अन्न पुरवठा निरिक्षक कुथे यांच्याशी चर्चा केली असता, गडचिरोली जिल्ह्यातील कुपोषण दूर करण्यासाठी शासनाने हे तांदुळ पुरविले असल्याचे सांगितले. १ क्विंटल तांदळामध्ये १ किलो कृत्रिम तांदूळ मिसळले  आहे. या तांदळात प्रोटीन्स आणि इतर घटक असल्याने ते खाल्याने कुपोषण दूर होइल असा शासनाचा विश्वास असल्याचे सांगितले. परंतू कुथे यांनी दिलेल्या माहिती नुसार आता पोर्टिफाईड तांदळाची वाटनी करण्याचे आदेश गडचिरोली जिल्ह्यात फक्त भामरागढ आणि कुरखेड़ा येथे आले असुन हे तांदूळ कोरची येथे आले कसे असा प्रश्न निर्माण होत आहे. 
लोकांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता तांदूळ वाटप झाले. लोकांमध्ये भिती आहे. तसेच या तांदळामध्ये कोणकोणते घटक आहेत त्याची माहिती द्यावी म्हणून तहसिलदारांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देतांना शालीकराम कराडे, भ्रष्टाचार निवारण समिति कोरचीचे तालुका उपाध्यक्ष आशिष अग्रवाल, शहर अध्यक्ष  चेतन कराडे,रुखमन घाटघुमर, तालुका सरचीटनिस श्यामकुमार यादव, शहर उपाध्यक्ष धम्मदीप लाडे, सदस्य निखिल साखरे आदी उपस्थित  होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-17


Related Photos