महत्वाच्या बातम्या

 विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते ब्रम्हपुरी तालुक्यात १४ कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण 


- ब्रम्हपूरी तालुक्यातील किन्ही, कोसंबी, पद्मापुर, भुज, एकारा, चिटकबोदरा, किटाळी, तुलानमेंढा गावांचा समावेश 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपूरी मतदारसंघात विकासाचा झंझावात सुरू केला असून मोठ्या प्रमाणात विकासकामे प्रगतीपथावर आहेत. तर नव्याने मंजूर झालेल्या व पुर्णत्वास आलेल्या ब्रम्हपूरी तालुक्यातील विविध गावांतील विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण नुकतेच पार पडले.

या भूमिपूजन व लोकार्पण झालेल्या विकासकामांमध्ये किन्ही येथे ३५ लाख रुपयांच्या सभागृहाचे बांधकाम, कोसंबी येथे १ कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे भुमीपुजन, पद्मापुर येथे ४५ लाख रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण, ८ लाख रुपयांच्या समाज मंदिर बांधकामांचे भुमीपुजन, भुज येथे ३० लाख रुपयांच्या सभागृह बांधकामांचे लोकार्पण, १५ लाख रुपयांच्या समाज मंदिर बांधकामाचे लोकार्पण, एकारा येथे ३५ लाख रुपयांच्या सभागृह बांधकामांचे भुमीपुजन, चिटकबोदरा येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत १ कोटी ४६ लाख रुपयांच्या डांबरीकरण रस्त्याचे लोकार्पण व २ कोटी ६२ लाख रुपयांच्या २ उंच पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन, किटाळी येथे २० लाख रुपयांच्या सभागृहाचे बांधकाम भुमीपुजन, तुलानमेंढा येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन ८ कोटी रुपयांच्या मेंडकी, तुलानमेंढा, जवराबोडी, आकापुर,रुपाळा, गवर्ला या १२.५० किमी. लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन या विकासकामांचा समावेश आहे.

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गावांतील नागरिकांसोबत चर्चा करीत त्यांच्या समस्यांचे निराकरण व गावातील पुढील विकासकामांच्या नियोजनाबाबत विकास आराखडा देखील तयार केला. देश व राज्य विकासाचा मुळ कणा असलेल्या ग्राम खेड्यातील समस्यांना जेव्हा पूर्ण विराम देऊ तेव्हाच संपूर्ण देशाचा सर्वांगीण विकास व प्रगती साधता येईल असा मानस ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी उपस्थित जनसमुदायाने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले.

याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, माजी जि.प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षा मंगला लोनबले, तालुका काँग्रेसचे सचिव सुरेश दर्वे, बाजार समितीचे संचालक किशोर राऊत, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर झरकर, युवक काँग्रेसचे दिपक ठाकरे, युवक काँग्रेसचे सरचिटणीस रुपेश बानबले, अनुसूचित जमाती सेलचे तालुकाध्यक्ष छत्रपती सुरपाम, किन्ही सरपंच धीरज धोंगडे, भुज सरपंच शालु रामटेके, उपसरपंच सुरेश ठीकरे, एकारा सरपंच रमेश भैसारे, उपसरपंच हरीचंद्र गेडाम, किटाळी सरपंच दिपक कुमरे, उपसरपंच दिनेश सुरपाम, तुलानमेंढा सरपंच पुनम कसारे, मोरेश्वर झोडे, प्रफुल ठिकरे, आशिष प्रधान, पुंडलिक प्रधान, अनुप प्रधान, सुनील राऊत, इंजि.अमोल सुकारे, प्रफुल ठीकरे, अशोक बोरकर, हर्षद भैसारे, बबलु मडावी, संवर्ग विकास अधिकारी संजय पुरी, बांधकाम विभाग अभियंता अजय चहांदे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता साहेबलाल मेश्राम, सुधीर पंदीलवार यांसह अन्य विभागाचे अधिकारी व संबंधित गावातील काॅंग्रेस कार्यकर्ते व नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos