विद्यार्थ्यांनी अडचणी तरी सामना करावा : नगराध्यक्ष योगीता पिपरे


- विविध उपक्रमांनी वाढदिवस उत्साहात 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  जिवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चीत करावे व ध्येय गाठताना अनेक अडचणी आल्या तरी त्याचा सामना करावा, असे आवाहन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले.
नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ८ जुलै रोजी  रामपुरी नगर परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना बुक, पेन व गणवेशाचे वितरण करण्यात आले. तसेच वृक्षारोपणही करण्यात आले. कैकाडी समाजाच्या बालकांना खाऊ वाटप करण्यात आले.  याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला नगरपरिषदेच्या शिक्षण  सभापती वर्षा बट्टे, नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेवक  रमेश भुरसे, नगरसेवक गुलाब मडावी,नगरसेवक सतीश विधाते,नगरसेविका  अल्का पोहणकर, नगरसेविका मंजूषा आखाडे, नगरसेविका लता लाटकर, नगरसेविका अनिता विश्रोजवार, दुर्गा मंगर, मुख्याध्यापक कांतीराव साखरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा भाविका बेहरे, सदस्य संजय कुकडे, मिलींद भानारकर, अर्चना आयतुलवार, शिक्षक वीरेंद्र सोनवाने, मेघा कोतपल्लीवार, शीला काळे, सरिता नरोटे, रूपाली पवनकर, गोविंदा परवते आदी मान्यवर उपस्थित होते. 
नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नगर परिषदेत वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर नगराध्यक्षा योगीता पिपरे यांचा कर्मचाऱ्यांमार्फत सत्कार करण्यात आला.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-08


Related Photos